चंद्रपूर:- विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मानसपुत्र, राज्यसभेचे उपसभापती, रिपब्लिकन पक्षाचे झुंझार नेते स्मृतीशेष चॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांचा जन्मशताब्दी महोत्सव चंद्रपूर येथे त्यांच्या जन्मगावी मोठ्या उत्साहात बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे जन्मशताब्दी महोत्सव समिती चंद्रपूरच्या विद्यमाने साजरा करण्यात येणार आहे. स्थानिक मिलन चौक ते छोटा बाजार चौक पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूने रोषणाई करण्यात येणार आहे.
बुधवार २४ रोजी बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे भवन येथे रिपब्लिकन जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोक निमगडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे तर उद्घाटन सुरेश नारनवरे करणार असून मार्शल अशोक टेंभरे स्वागताध्यक्ष असणार आहेत या कार्यक्रमात चंद्रपूर शहरातील व जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना विचार व्यक्त करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
बॅरिस्टर साहेबांच्या जयंती दिनी २६ सप्टेंबर रोजी सकाळी ९:३० वा बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे पुतळ्याला माल्यार्पण व अभिवादन करण्यासाठी मा. विनय गौडा जिल्हाधिकारी, मा. मुमक्का सुदर्शन जिल्हा पोलिस अधीक्षक, मा. पुलकित सिंग मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, मा. एस. के. गजभिये कार्यकारी संचालक चंद्रपूर फेरो अलॉय प्लांट, डॉ. मिलिंद कांबळे अधिष्ठाता शासकीय रुग्णालया, मा. चंदन पाटील अतिरिक्त आयुक्त म.न.पा यांची प्रामुख्यानं उपस्थित राहणार आहेत त्यानंतर १०:०० वा बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे भवन येथे आदरांजली व बुद्ध वंदना भदंत अनिरुद्ध थेरो यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
सायंकाळी ४:०० मुख्य जन्मशताब्दी महोत्सव कार्यकाम स्थानिक गांधी चौक येथे संपन्न होणार असून भारत सरकार डाक विभाग तर्फे जन्मशताब्दी निमित्ताने डाक तिकिटाचे विमोचन सोहळा होणार असून अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष प्रवीण हेमचंद्र खोबरागडे राहणार असून प्रमुख अतिथी आ. विजय वडेटीवर माजी विरोधी पक्षनेते विधानसभा, आ. सुधीर मुनगंटीवार माजी कॅबिनेट मंत्री, खा. प्रतिभा धानोरकर आ. किशोर जोरगेवार, आ. सुधाकर अडबाले उपस्थित राहणार असून मारोतराव खोबरागडे हे स्वागताध्यक्ष असतील.
सायं ७:०० वा प्रबोधन सभेचे आयोजन देशक खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले असून प्रमुख मार्गदर्शक ज.वी. पवार जेष्ठ साहित्यिक व विचारवंत मुंबई राहतील प्रमुख अतिथी रोहिदास राऊत जेष्ठ रिपब्लिकन नेते गडचिरोली आणि अॅड. रामभाऊ मेश्राम माजी नगराध्यक्ष, गडचिरोली असतील या कार्यक्रमाचे उद्घाटक प्रा. नितीन रामटेके तर स्वागताध्यक्ष किशोर सवावे राहणार आहेत.
शुक्रवार २६ सप्टेंबर रोजी सायं ५ वा प्रा डॉ विद्याधर बनसोड यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे या प्रसंगी प्रमुख वक्ते प्रा. डॉ. प्रदीप आगलावे मार्गदर्शन करणार आहेत प्रमुख अतिथी डॉ. मनोहर टेंभुरकर, तळोधी यांची उपस्थिती असेल परिसंवादाचे उद्घाटन निर्मला नगराळे यांच्या हस्ते होणार असून सत्यजित खोबरागडे स्वागताध्यक्ष असतील. त्यानंतर ७:०० वाजता बुद्ध भीम गीतांवर आधारित भव्य समूह नृत्य स्पर्धेचे आयोजित करण्यात आले असून या कार्यक्रमाला पुणे येथील नामांकित उद्घोषक दिव्या सरकार उपस्थित राहणार आहे.
समारोपीय कार्यक्रम २७ सप्टेंबर सायंकाळी ५:०० वा जल्लोष भीमराजच बुद्ध भीम गीतांचा बहारदार कार्यक्रम महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक साजन बेंद्रे व संच मुंबई प्रस्तुत करणार असून अश्विनी रोशन आणि साची अलोने यांचा विशेष सहभाग असणार आहे. उद्घाटन गीता रामटेके करणार असून आर्कि. राजेश रंगारी स्वागताध्यक्ष पद भूषविणार आहेत असे पत्रकार परिषदेत प्रवीण खोब्रागडे आणि देशक खोब्रागडे यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला प्रतीक डोलीकर, ॲड. राजस खोबरागडे, केशव रामटेके, अशोक टेंभरे, प्रेमदास बोरकर, राजूभाऊ खोब्रागडे शंकर वेल्हेकर, हरिदास देवगडे, मृणाल कांबळे, ज्योती शिवणकर, प्रेरणा करमरकर, पंचफुला वेल्हेकर, अश्विनी आवळे, वैशाली साठे, छाया थोरात, अनिता जोगे, दिलीप डांगे, प्रा. जे. टी. लोणारे ज्योति साहरे, योगिता रायपुरे, महादेव कांबळे, अशोक फुलझले, मुन्ना खोबरागडे, विजय करमरकर, प्रभूदास माऊलीकर, संजय ढेपे, दिलीप वावरे, अनंत बाबरे, हर्षल खोबरागडे, अॅड. राजेश वनकर, अनिल आलोने, डॉ. मुकुंद शेंडे, डॉ. टी. डी. कोसे, सचिन पाटील, राजकुमार जवादे, चेतन उंदीरवाडे, शिधार्थ शेंडे, कैलाश शेंडे, वसंत रंगारी, राजश्री शेंडे, शीला कोवले, लीना खोब्रागडे, सुनीता बेताल, पौर्णिमा जुलमे, समता खोब्रागडे, पौर्णिमा गोंगले, सोहण रंगारी उपस्थित होते.