भद्रावती:- नेताजी कॉलनी बंगाली कॅम्प परिसरातील हेमंत समझदार यांच्या घरापासून ते राजेश बैरागी यांच्या घरापर्यंतचा रस्ता व नाल्यांची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत, अशी मागणी नुकतीच करण्यात आली. या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता डॉ. रतन बाला यांच्या नेतृत्वात मा. आमदार करण संजय देवतळे व नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सदर रस्ता सध्या अपूर्ण अवस्थेत असून मोठे खड्डे तयार झाले आहेत. पावसामुळे या खड्ड्यांत पाणी साचून नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. तसेच नाल्यांचे बांधकाम न झाल्याने परिसरातील घरे पावसाच्या पाण्याने बाधित होत आहेत.
नागरिकांना होणाऱ्या या गैरसोयींचा विचार करून रस्ते व नाल्यांची कामे तातडीने सुरू करून पूर्ण करण्यात यावीत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या प्रसंगी डॉ. रतन बी. बाला, हेमंत समझदार आदी उपस्थित होते.
आधार न्युज नेटवर्क/जितेंद्र माहूरे भद्रावती तालुका