
भद्रावती:- महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील कर्तृत्ववान मार्गदर्शक लोकनेते स्व. दादासाहेब देवतळे यांचा ३९ वा स्मृती सोहळा येत्या १५ सप्टेंबर २०२५ रोजी सोमवार दुपारी १२.३० वाजता स्व. दादासाहेब देवतळे शेतकरी भवन, वरोरा येथे साजरा करण्यात येणार आहे हा सोहळा लोकनेते स्व. दादासाहेब देवतळे यांचा उल्लेखनीय जीवनकार्य आणि महाराष्ट्रातील समाजकल्याणसाठी केलेल्या अमूल्य योगदानाला अभिवादन करण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे.
हा स्मृती सोहळा चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा परिसरात वरोरात होणार असून कार्यक्रमाचे आयोजन ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ, वरोरा व अन्य संस्थांच्या संयुक्त प्रयत्नांतून करण्यात आले आहे. या स्मृती सोहळ्यात मान्यवरांची उपस्थिती निश्चित झाली आहे. यांचा सन्मानार्थ आयोजित सोहळ्यात राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी गृह राज्य मंत्री भारत सरकार हंसराजअहीर सहभागी होतील. यानंतर माजी कुलगुरू पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला डॉ. शरदराव निंबाळकर विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील. तसेच राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार सुभाष धोटे आणि वरोरा विधानसभा क्षेत्राचे आमदार करण देवतळे यासह अनेक बहुप्रतिष्ठित पाहुणे या स्मृती सोहळ्यात उपस्थित राहणार आहेत.
या प्रसंगी स्मृती सोहळ्याची सुरुवात सकाळी ८ ते ९ वाजता वरोरा उपजिल्हा रूग्णालयात रूग्णांना फळवाटप, सकाळी ९ ते ११ वाजता आचार्य विनोबा भावे ग्रामीण रूग्णालय, सांवगी येथील वैद्यकीय पथकाच्या माध्यमातून रक्तदान व आरोग्य शिबीर, सकाळी ११ ते १२ वाजता स्व. दादासाहेब देवतळे शेतकरी भवन येथे शेतकरी मार्गदर्शन, दुपारी १२.३० वाजता मुख्य श्रद्धांजलीपर कार्यक्रम, ज्यामध्ये स्व. दादासाहेब देवतळे यांच्या प्रतिमेचे पूजन, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा अभिमाननिय सत्कार आणि प्रमुख पाहुण्यांचे मनोगत व्यक्त होणार आहेत.
तसेच दुपारी ३ वाजता समारोपानंतर अल्पोपहार व सांस्कृतिक कार्यक्रम
याशिवाय ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ, वरोरा अध्यक्ष डाॅ.विजय देवतळे, संचालक मंडळ तसेच कार्यरत मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांची देखील येथील देवतळे परीवार समर्थकांना जास्तीत जास्त संख्येत सहभागी होण्याची विनंती केली आहे.
लोकनेते स्व. दादासाहेब देवतळे यांचा महाराष्ट्राच्या विकासात आणि सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात अतुलनीय वाटा होता. त्यांच्या अथक परिश्रमामुळे राज्यातील शेतकऱ्याचे जीवनमान सुधारण्यास तसेच शिक्षण व आरोग्य क्षेत्रात प्रगती करण्यास मोठा चालना मिळाला होता. त्यामुळे हा स्मृती सोहळा त्यांच्या आदर्श कार्याची आठवण करून देणारा एक महत्त्वाचा सामाजिक सोसळा मानला जातो.
या स्मृती सोहळ्यात एकतेचे, आदराचे व सामाजिक बांधिलकीचे संदेश पाठवले जातील, जे पुढील पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरतील, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.

