नवी दिल्ली:- जगदीप धनखड यांनी अधिवेशनकाळातच अचानक राजीनामा दिल्याने उपराष्ट्रपतीपदासाठी आज मतदान झाले आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे विजयी झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. इंडिया आघाडीकडून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी हे उमेदवार होते.
एकूण मतदान 768 झाले होते, परंतू १५ मते अवैध ठरली आहेत. सीपी राधाकृष्णन यांना ४५२ मते मिळाली आहेत. तर बी सुदर्शन रेड्डी यांना ३०० मते मिळाली आहेत. एनडीएची मते वाढल्याने इंडिया आघाडीला मोठा सुरुंग लागला आहे.