चंद्रपूर:- दिनांक ०६ सप्टेंबर, २०२५ रोजी चंद्रपूर शहरामध्ये श्री गणेश विसर्जन मिरवणूक निघणार आहे. सदर विसर्जन मिरवणुकी मध्ये जवळपास सर्व सार्वजनिक गणपती मंडळ भाग घेत असतात, अशा वेळी या मिरवणुक मार्गावर देखावे पाहण्याकरीता नागरीकांची मोठ्या प्रमाणात गर्दी/वर्दळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे दिनांक ०६ सप्टेंबर, २०२५ रोजी सार्वजनिक श्री गणेश उत्सवाचे कार्यक्रमामध्ये रहदारीला अडथळा निर्माण होवुन नागरीकांना विशेषतः लहान बालके, महिला आणि वरिष्ठ नागरीकांना सुध्दा त्रास होवू नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये म्हणुन विसर्जन मिरवणुक पाहण्याकरीता पायी चालणाऱ्या नागरिकांनी खालील मार्गाचा अवलंब करावा.
गांधी चौक कडे जाण्याकरीता:
जटपुरा गेट जवळील डॉ. अल्लुरवार हॉस्पीटल मार्गे ▶ बैंगलोर बेकरी मार्ग ▶ कस्तुरबा रोड गिरनार चौक ▶ गांधी चौक या मार्ग चा वापर करावा.
जटपुरा गेट कडे परत येतांना:
गांधी चौक मार्गे ▶ डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे ▶ लोकमान्य टिळक विद्यालय समोरुन ▶ सामान्य रुग्णालय मार्गे ▶छोटा बाजार ▶ जटपुरा गेट या मार्गाचा अवलंब करावा.
कोणीही नागरीक जटपुरा गेट ते गांधी चौक मार्गे उलट दिशेने पायी चालत जावू नयेत. शहरात प्रवेश करतांना कस्तुरबा रोड ने प्रवेश करावा. पोलीस आणि प्रशासनाच्या सुचनांचे पालन करुन मिरवणुक बंदोबस्त शांततेत व योग्य पध्दतीने पार पाडण्यास सहकार्य करावे.