चंद्रपूर:- चिमूर तालुक्यातील मौजा वाहनगावमध्ये मध्या जोरावर मनमानी कारभार करणाऱ्या कष्ट सरपंचाला अखेर पदावरून पायउतार व्हावे लागले आहे. शासनाकडून मिळालेल्या निधीचा गैरवापर केल्यामुळे सरपंच प्रशांत कोल्हे यांची पदावरून हकालपटटी करण्यात आली असून, एका महिलेने दाखवलेल्या धैर्यामुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत प्रियंका ठमके-रामटेके यांनी दिली आहे.
सरपंचपदी निवड झाल्यानंतर प्रशांत कोल्हे यांनी गावात आपती हुकूमत गाजवण्यास सुरुवात केली. त्यांनी कोणताही नियम किंवा कायदा न पाळता मनमानी कारभार केला. गावातील लोकांमध्ये, विशेषतः अनुसूचित जाती आणि जमातीच्या लोकांमध्ये, ते तणावाचे वातावरण निर्माण करत होते. परंतु, त्यांच्या सत्तेची मस्ती लवकरच उतरली.
याचदरम्यान, मंगलाबाई गौरकर या महिलेचा मृत्यू झाल्यावर, त्यांनी एक अत्यंत बेकायदेशीर कृत्य केले. त्या महिलेच्या खन्या वारसांना डावलून, त्यांनी मौजा खडसंगी येथील एका दुसऱ्याच महिलेला तिच्या मृत्यूनंतर वारसा दाखला दिला. वास्तविक पाहता, असा दाखला देण्याचा अधिकार सरपंचाला नाही. सतेच्या अहंकारातून त्यांनी हे कृत्य केले आणि याच कृत्यामुळे त्यांच्या पतनाचा मार्ग सुरू झाला.
सरपंचाच्या या बेकायदेशीर कृत्याचा पर्दाफाश करण्याचा निर्णय प्रियंका ठमके यांनी घेतला. त्यांनी औरंगाबाद खंडपीठ आणि इतर न्यायालयांकडून आदेश मिळवून विभागीय आयुक्त, नागपूर यांच्याकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीमुळे ग्रामपंचायतीच्या कामांची चौकशी सुरू झाली. ही चौकशी पूर्ण होण्यासाठी दोन वर्षाचा कालावधी लागला, पण प्रियंका ठमके यांनी आपला लढा सोडला नाही.
चौकशीदरम्यान, ग्रामपंचायतीच्या निधीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे स्पष्ट झाले. पंचायत समितीने आपला चौकशी अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी, चंद्रपूर यांच्याकडे पाठवला. या अहवालावर कार्यवाही करत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सरपंच प्रशांत कोल्हे यांना पदासाठी अपात्र ठरवण्याची शिफारस केली. विभागीय आयुक्त, नागपूर यांनीही या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आणि अखेर सरपंच कोल्हे यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली.
एका महिलेच्या अथक प्रयत्नामुळे आणि तिच्या हिमतीमळे एका धष्ट सरपंचाचा खोटेपणा उघड झाला. हा संघर्ष केवळ वाहनगावसाठीच नाही, तर संपर्ण समाजासाठी एक प्रेरणादायी उदाहरण आहे. या घटनेने हे सिद्ध झाले आहे की, जर आपण सत्यासाठी लढण्याचा निश्चय केला, तर कितीही मोठा व्यक्ती असो, तो कायद्यापुढे झुकतोच.
आपल्या पदावरून हकालपट्टी झाल्यानंतर सरपंच प्रशांत कोल्हे शासनालाच दोषी ठरवत आहेत. 'मी वारसा दाखला दिलाच नाहीः असे ते मुख्य कार्यकारी अधिकान्यांच्या दालनात खोटे बोलल्याचा आरोप प्रियंका ठमके - रामटेके यांनी केला आहे. जर त्यांनी दाखला दिला नाही, तर त्यांच्या सही-शिक्क्याने तो दुसऱ्या महिलेकडे कसा पोहोचलात या बाबत त्या महिले विरोधात पोलिस स्टेशन ला का तक्रार केली नाही? प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे नाही. या घटनेनंतर पिसाळलेल्या सरपंचाचे खोटे मुखवटे गळून पडले आहेत, आणि त्यांचे बेताल वक्तव्य त्यांच्याच पापांची साक्ष देत आहे.
या पत्रकार परिषदेला प्रियंका ठमके-रामटेके,मंथन थुटे, सुरज रामटेके, विशाल मेश्राम उपस्थित होते.



