Mungantiwar-jorgewar Dance: मुनगंटीवार-जोरगेवार "बाप तो बाप रहेगा" गाण्यावर थिरकले, व्हिडिओ व्हायरल

Bhairav Diwase

चंद्रपूर:- सध्या राजकारण क्षेत्रातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. चंद्रपूरमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळाला.
चंद्रपूरच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत यंदा राजकीय नेत्यांचा एक हटके अंदाज पाहायला मिळाला. नेहमीच गंभीर विषयांवर बोलणारे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी डीजेच्या तालावर ठेका धरला. "बाप तो बाप रहेगा" या गाण्यावर दोन्ही नेते थिरकताना दिसले.
या मिरवणुकीत कार्यकर्त्यांच्या उत्साहात भर घालण्यासाठी मुनगंटीवार आणि जोरगेवार यांनी आपापल्या मंडपासमोर उत्स्फूर्तपणे डान्स केला. त्यांच्या या नृत्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.