पोंभुर्णा:- पोंभुर्णा येथे भारतीय जनता पार्टीने आपली नवीन तालुका कार्यकारिणी जाहीर केली आहे. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार आणि जिल्हाध्यक्ष हरिष शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली ही जंबो कार्यकारिणी तयार करण्यात आली आहे. यात विविध जाती-धर्मांच्या आणि समाजातील तरुण आणि अनुभवी कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे. या नव्या कार्यकारिणीत विविध पदाधिकाऱ्यांची आणि आघाडीच्या प्रमुखांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
पोंभुर्णा येथील भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष हरिष ढवस यांनी या नविन कार्यकारिणीची घोषणा केली आहे. यात सर्व समाजातील कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. नव्या कार्यकारिणीत महामंत्री, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष, सदस्य तसेच विविध आघाड्यांच्या प्रमुख व महामंत्रीचा समावेश आहे.
प्रमुख पदाधिकाऱ्यांची नावे:
महामंत्री: विनोद देशमुख, गुरुदास पिपरे, ज्योती बुरांडे
उपाध्यक्ष: धनराज बुरांडे, राहुल पाल, मनोज मुलकलवार, तुळशिराम रोहणकर, रंजीत पिंपळशेंडे, सौ. सुनीता म्याकलवार, माधुरी मोरे
सचिव: बंडू नैताम, सौ. श्वेता वनकर, गंगाधर मडावी, रजिया कुरेशी, नैलेश चिंचोलकर, जमनादास गोवर्धणे
कोषाध्यक्ष: लक्ष्मण ठेंगणे
सदस्य: कुंदाताई जुमनाके, यशवंत ढोंगे, भोजराज चुदरी, भारत निमसरकार, प्रभाकर पिंपळशेंडे, भगवान पाल ललिता कोवे, सुधाकर डायले, साईनाथ मंदाडे, गणपती फरकडे, नवनाथ आत्राम, रोशन ठेंगणे, सचिन पोतराजे, यशवंत कोसरे, पुरुषोतम गव्हारे, विलास सातपुते, नानाजी टेकाम, नितिन पैदोर, श्रीकांत वडस्कर, गंगाधर अलवे, भारत कुळमेथे, सुनील कोतपल्लीवार, मनोहर बुरांडे, बंडू लेणगुरे रेवनाथ मिसार, गंगाधर बुरांडे, धनराज सातपुते, संतोष पोलेलवार, किशोर दूधबळे, ललिता पोरटे, कीर्ती सातपुते, शिल्पा नागुलवार, रजनी हस्से, मंगला सोनटक्के, दर्शना वाकडे, उशाराणी वनकर, हीना विश्वास, मोहिनी धोडरे, माया कोहळे, काविता मडावी, योगिता गौरकर, अल्का गड्डमवार, विलास निखाडे, शेखर व्याहाडकर
विविध आघाड्या आणि त्यांचे प्रमुख:
भाजपच्या विविध आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांचीही घोषणा करण्यात आली आहे.
भाजयुमो (भाजप युवा मोर्चा): अध्यक्षपदी अजय मस्के, तर महामंत्रीपदी चंद्रशेखर झगडकर, जितेंद्र चुधरी, वैभव ठाकरे, अमोल पाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महिला मोर्चा: अध्यक्षपदी वैशाली बोलमवार यांची निवड झाली असून, महामंत्री म्हणून छाया जनगनवार, वनिता वाकुडकर, शुभांगी कुत्तरमारे, पपिता तोडसाम, आणि पपिता पोलपोलवार काम पाहतील.
अनुसूचित जाती (एस.सी.): सुगत गेडाम अध्यक्ष तर मंगेश उपरे आणि राजरतन खोब्रागडे महामंत्री आहेत.
अनुसूचित जमाती (एस.टी.): गजानन मडावी अध्यक्ष आणि सिताराम मडावी, रमेश वेलादी, शुभम कुळमेथे महामंत्री आहेत.
ओबीसी: ईश्वर नैताम अध्यक्ष तर रामकृष्ण गव्हारे, हेमंद्र देवाळकर, राकेश गव्हारे महामंत्री आहेत.
किसान मोर्चा: ओमदास पाल अध्यक्ष तर नरेंद्र पिपरे, भगीरथ पावडे महामंत्री आहेत.
अल्पसंख्यांक: इकबाल कुरेशी अध्यक्ष आणि हमान कुरेशी, जावेद शेख महामंत्री आहेत.
याशिवाय, व्यापारी आघाडीचे अध्यक्ष आशिष बुक्कावार, वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष नितेश पावडे, मच्छिमार आघाडीचे अध्यक्ष कपिल सरपे, भटक्या विमुक्त आघाडीचे प्रमुख अरुण मडावी आणि सोशल मीडिया प्रमुख म्हणून धीरज गुरनुले यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टी तालुका पोंभुर्णा नवनियुक्त पदाधिकारी यांचे आमदार सुधीर मुनगंटीवार, माजी खा. हसंराज अहिर, जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, प्रदेश महामंत्री अल्का आत्राम, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवार, नगराध्यक्षा सुलभा पिपरे, उपनगराध्यक्ष अजित मंगळगिरीवार, ऋषी कोटरंगे , दिलीप मॅकलवार यांनी अभिनंदन केले आहे.
पोंभुर्णा भाजपच्या या नवीन कार्यकारिणीत सर्वसमावेशकतेला महत्त्व दिल्याचे दिसून येते. यामुळे आगामी काळात पक्ष संघटना अधिक मजबूत होऊन लोकाभिमुख काम करेल अशी अपेक्षा आहे.