Smallest Woman in the World: चंद्रपूर जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण! चंद्रपूरची कन्या धन्यनेश्वरी दुणेदार हिचा विश्वविक्रम

Bhairav Diwase

चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यासाठी आजचा दिवस खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरला आहे. याच जिल्ह्याची कन्या धन्यनेश्वरी दुणेदार हिने आपल्या उंचीच्या जोरावर संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. फक्त २.३ फूट उंची असलेल्या धन्यनेश्वरीचे नाव 'International Book of Records' मध्ये 'Smallest Woman in the World' म्हणून नोंदविण्यात आले असून, जिल्हाधिकारी यांच्या हस्ते तिला अधिकृत प्रमाणपत्र आणि पदक प्रदान करण्यात आले.


चंद्रपूर जिल्ह्यातील धन्यनेश्वरी दुणेदार हिने आपल्या असामान्य उंचीमुळे एक जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. केवळ २.३ फूट उंची असलेली धन्यनेश्वरी आता जगातील सर्वात कमी उंचीची महिला ठरली आहे. तिच्या या विक्रमाची नोंद 'International Book of Records' मध्ये करण्यात आली आहे.


या यशामागे अलंकार सावळकर आणि आम आदमी पार्टी, चंद्रपूर महानगर अध्यक्ष योगेश दे. गोखरे यांचे विशेष योगदान आहे. एका योगायोगाने त्यांची भेट धन्यनेश्वरीशी झाली. तिच्या खूपच कमी उंचीची नोंद घेतल्यानंतर त्यांनी तिचे नाव गिनीज बुकमध्ये नोंदवण्याचा निर्धार केला. अथक प्रयत्नांनंतर त्यांचे हे स्वप्न साकार झाले.


चंद्रपूर जिल्हाधिकारी यांच्या हस्ते धन्यनेश्वरीला अधिकृत प्रमाणपत्र आणि पदक प्रदान करून तिचा सन्मान करण्यात आला. या सन्मानाने धन्यनेश्वरीचे कुटुंब आणि संपूर्ण जिल्हा आनंदी आहे. धन्यनेश्वरीच्या या यशाने चंद्रपूर जिल्ह्याची मान जगात उंचावली आहे.


यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना धन्यनेश्वरी म्हणाली, "मला कधी वाटले नव्हते की माझी ही कमजोरीच माझी सर्वात मोठी ताकद बनेल. अलंकार दादा आणि योगेश दादा यांच्या मदतीने मला हा किताब मिळाला आहे. त्यांचे आणि माझ्या कुटुंबाचे आभार. तसेच, आम आदमी पार्टीच्या सहकार्याबद्दल आणि जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःच्या हस्ते सन्मान दिल्याबद्दल मी मनःपूर्वक आभार मानते.