जिवती:- महाराष्ट्रातील आदिवासी समाजाच्या आरक्षणामध्ये बंजारा अथवा कोणत्याही जातीचा समावेश करू नये, जिवती तालुक्यातील वन क्षेत्रातील समाविष्ट असलेली आणि निर्वानिकरण झालेली एकूण त्याची पूर्णमोजनी करून जुन्या अभिलेख नुसार नोंद घेण्यात यावी, जिवती तालुक्यातील आदिवासींना महसूल विभागाने दिलेल्या व निजाम कालीन शासनाने सर्व आदिवासी दिलेल्या पट्यांचे पूर्नमोजनी करून ज्या ज्या आदिवासींच्या नावे आहे त्या आदिवासींच्या वारसांना देण्यात यावे, व जुन्या गावठाण जमिनीचा हद्द निश्चित करावा, पेसा भरती बाबतील १७ संवर्गातील सरळ सेवेतील पदे मानधन तत्वावर भरण्याबाबत शासन निर्णय रद्द करावा, अनुसूचित जमाती करिता ७.५० ऐवजी १५% सरसकट आरक्षण देण्यात यावे. अश्या विविध मागण्या घेऊन हा मोर्चा पार पडला.
जिवती तहसीलदार मार्फत मा. मुख्यमंत्री आणि मा.राज्यपाल मोहदया पर्यंत निवेदन देऊन या मागण्या केल्या आहे. या मागण्यांची पूर्तता होई पर्यंत आपला लढा सुरू राहणार आहे. त्यासाठी योग्य ते नियोजन करण्यात येणार आहे.
या मोर्चा मध्ये माझ्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य भिमराव पाटील मडावी, जेष्ठ नेते बापूराव मडावी, डॉ. प्रवीण येरमे, डॉ. मधुकर कोटणाके, किसन कोटणाके, हनुमंत कुमरे, संजय सोयाम, भिमराव मेश्राम, नामदेव जुमणाके, मारू नैताम, प्रा. लक्ष्मण मंगाम, सीताराम मडावी, कंटू कोटणाके, इसतराव आत्राम, मंगेश पंधरे यांच्यासह तालुक्यातील हजारो आदिवासी समाज बांधव उपस्थित होते.