चंद्रपूर:- यावर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण होत आहे. या शताब्दी वर्षाच्या चंद्रपूर महानगराचा श्री विजयादशमी उत्सव रविवार, दि. ०५ /१०/२०२५ ला ठीक सायं ०६.३० वाजता. पोलीस फुटबॉल ग्राउंड, तुकूम रोड, चंद्रपूर येथे आयोजित केला आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून पुरुषोत्तम सातपुते, जेष्ठ विधिज्ञ, चंद्रपूर हे उपस्थित असणार आहे. प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सह- प्रचार प्रमुख प्रदीपजी जोशी हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे. तरी चंद्रपूर शहरातील सर्व स्वयंसेवकानी, नागरिकांनी, विविध संघटना व संघटना पदाधिकारी यांनी सहपरिवार या जाहीर कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नगर संघचालक रवींद्र भागवत, चंद्रपूर नगर तर्फे करण्यात येत आहे.
पथसंचलन
सर्व स्वयंसेवकांचे पथसंचलन रविवार दिनांक ०५/१०/२०२५ ला सायंकाळी ठीक ०४.३० वाजता पोलीस फुटबॉल ग्राउंड, तुकूम रोड,चंद्रपूर येथून तुकूम परिसरात मुख्य रस्त्याने निघेल.


