Suicide News: युवकाची तलावात उडी घेऊन आत्महत्या


बल्लारपूर:- बल्लारपूर पेपर मिल कंत्राटी कामगार युवकाने बामणी येथील तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी दि. ३‌ ऑक्टोबरला सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. राहुल मधुकर फरकाडे वय ३६, रा. विठ्ठलवाडा असे मृताचे नाव आहे. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.

राहुल फरकाडे हा बामणी येथे भाड्याची खोली करून राहत होता. गुरुवारी (दि. २) रात्री बल्लारपूर पेपर मिलमध्ये कर्तव्य बजावून बामणीकडे निघाला. मात्र, खोलीवर न येता गावातीलच तलावात उडी घेतली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या