गोंडपिपरी:- गोडपिंपरी तालुक्यातील करंजी ग्रामपंचायत अंतर्गत वार्ड क्र. 2 जोगापूर गावाच्या समावेश आहे. तरी सुरुवाती पासून हे गाव पाणीपुरवठा योजने पासून वंचित राहून परिणामी गावकरी बोरिंगच्या क्लोराइडयुक्त पाण्याचा वापर करून तहान भागवीत आहे. करंजी ग्रामपंचायत जोगापूर येथे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा योजनेच्या निधीतून जनजीवन मिशन अंतर्गत सन 2022 - 23 मध्ये पाण्याच्या टाकीचे बांधकाम काम करून तीन वर्ष लोटूनही पाण्याच्या पुरवठा झाला नाही. तरी मागील या विषयावर जोगापूर गावकर्यांनी पंचायत समिती समोर गोंडपिपरी येथे उपोषण करण्यात आले होते.तरी ग्रामपंचायत सरपंच तसेच संबंधित विभागातील अधिकारी यांनी लेखी आश्वासन देण्यात आलेले होते.तरी पाणीपुरवठा चालू करण्यात आलेला नाही.
दि.18 नोव्हेंबर करंजी ग्रामपंचायत तसेच संबंधित विभागाला पत्र व्यवहार करून समस्या सोडवण्याबाबत पत्र दिले असल्याने यावर ग्रामपंचायत तसेच संबंधित विभागातील यांनी आठ दिवसाच्या मुदत मध्ये प्रश्न मार्गी न लागल्यास. जोगापूर येथील सामाजिक कार्यकर्ते छत्तर सिंग डांगी ,पुरुषोत्तम पेंढारकर, दिलीप शेट्टीवार, अंकुश बुरेवार, नितीन रायपुरे व समस्त जोगापूर गावकर्यांनी रस्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे.
जोगापूर गावात साठी स्वतंत्र टाकी उभी आहे मात्र स्वतंत्र मोटर न बसविल्याने गावकऱ्यांची ओरड होत आहे.तरी ग्रामपंचायतील सरपंच तसेच संबंधित विभागाने स्वतंत्र मोटर बसवून पाणीपुरवठा सुरळीत करावी.
छत्तरसिंग डांगी
सामाजिक कार्यकर्ते, जोगापूर


