Chandrapur Municipal Corporation : चंद्रपूर महानगरपालिकेत निवडणूकीची रणधुमाळी, आचारसंहिता लागू; १५ जानेवारीला होणार मतदान

Bhairav Diwase

चंद्रपूर:- राज्यातील २९ प्रलंबित महानगरपालिका निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज, सोमवार, १५ डिसेंबर २०२५ रोजी पत्रकार परिषदेत निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला. मुंबई, पुणे, नागपूरसह चंद्रपूर महानगरपालिकेचाही यात समावेश आहे.


या निवडणुकीसाठी मतदान १५ जानेवारी २०२६ रोजी होणार असून, मतमोजणी १६ जानेवारी २०२६ रोजी होईल.

या घोषणेमुळे महानगरपालिका निवडणुकीची तयारी करणाऱ्या सर्वच राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी याबाबतची घोषणा केली.



महत्वाचे टप्पे (Important Dates)

निवडणूक आयोगाने जाहीर केलेले महत्त्वाचे टप्पे खालीलप्रमाणे आहेत:

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत: २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२५

अर्जांची छाननी: ३१ डिसेंबर २०२५

उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत: २ जानेवारी २०२६

अंतिम उमेदवारांची यादी जाहीर: ३ जानेवारी २०२६

मतदान: १५ जानेवारी २०२६

मतमोजणी आणि निकाल: १६ जानेवारी २०२६

आचारसंहिता लागू

निवडणूक आयोगाच्या घोषणेसोबतच आजपासून (१५ डिसेंबर २०२५) संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रात आचारसंहिता (Code of Conduct) तात्काळ लागू झाली आहे. यापुढे, कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्यापूर्वी निवडणूक आयोगाची परवानगी घेणे बंधनकारक असेल.