Chandrapur News: बंदुकीचा धाक दाखवून कंत्राटदाराकडून उकळले अठरा लाख पन्नास हजार!

Bhairav Diwase


चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील बांधकाम कंत्राटदाराचे अपहरण करून बंदुकीचा धाक दाखवत त्याच्याकडुन तब्बल १८.५० लाख रुपये घेतल्याची धक्कादायक घटना चंद्रपूरात घडली. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना चंद्रपूर नागपूर महामार्गावरील शनि मंदिर परिसरात घडली. पडोली पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ आपले चक्र फिरवले आणि तीन आरोपींना ताब्यात घेतले. आकाश वाढई, भारत माडेश्वर, योगेश गोरडवार असे आरोपीचे नाव आहे. या प्रकाराची तक्रार काहिलकर यांनी पोलिसात दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक योगेश हिवसे करीत आहे.