Pombhurna News: चेक आष्टा फाट्याजवळ टँकरची ऑटोला धडक; दोन महिला गंभीर जखमी

Bhairav Diwase

पोंभुर्णा:- चेक आष्टा फाट्याजवळ भटारीकडे जाणाऱ्या ऑटोला टँकरने धडक दिल्याने दोन महिला गंभीर जखमी झाल्या. ही घटना मंगळवारी दि. ९ डिसेंबरला संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. मंगला कन्नाके (५५) व रुसा आत्राम (६५, रा. भटारी) अशी जखमींची नावे आहेत. 

मंगला कन्नाके व रुसा आत्राम या महिला पोंभुर्णा येथील आंदोलन आटोपून एमएच ३४ बीएच ४१४६ क्रमांकाच्या ऑटोने भटारीकडे जात होत्या. चेक आष्टा फाट्याजवळ केए २५ डी ०९११ क्रमांकाच्या टँकरने ऑटोला जोरदार धडक दिली. यात दोन्ही महिला गंभीर जखमी झाल्या. त्यांना पोंभूर्णा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचेवर उपचार सुरू आहे.