चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशन चंद्रपूर निवडणुकीत अध्यक्ष पदी ॲड. विक्रम टंडन, उपाध्यक्ष पदी ॲड अमन मारेकर तर सचिव पदी ॲड. अभिजित किन्हीकर यांची निवड.

Bhairav Diwase
चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशन चंद्रपूर निवडणुकीत अध्यक्ष पदी ॲड. विक्रम टंडन, उपाध्यक्ष पदी ॲड  अमन मारेकर तर सचिव पदी ॲड. अभिजित किन्हीकर यांची निवड.


चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशन, चंद्रपूर येथील निवडणूक नुकतीच शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या निवडणुकीत वकिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून लोकशाही प्रक्रियेला बळ दिले. मतदानानंतर झालेल्या मतमोजणीत विविध पदांवर उमेदवारांनी स्पष्ट बहुमताने विजय मिळविला.


या निवडणुकीत अध्यक्ष पदी ॲड. विक्रम टंडन, उपाध्यक्ष पदी ॲड. अमन मारेकर, सचिव पदी ॲड. अभिजित किन्हीकर, सहसचिव पदी ॲड. तृप्ती मांडवगडे, कोषाध्यक्ष पदी ॲड. मुर्लीधर बावनकर तर ग्रंथपाल पदी ॲड. राहुल थोरात यांची निवड करण्यात आली . सोबतच महिला राखीव मध्ये ॲड. सरोज कदम, ॲड. राजलक्ष्मी रामटेके, ॲड. माहेश्वरी सोनुले, तर कार्यकारणी सदस्यमध्ये ॲड.  वर्षा उपाध्याय, ॲड. आकाश गिरी, ॲड. मनोज मिश्रा, ॲड. तोषित कीन्नाके, ॲड. सपना शेट्टी, ॲड. सुरेश दुर्गम, ॲड. स्वाती समर्थ, ॲड. शरीफ मिर्झा, ॲड. सोपान जवंजार, ॲड. रोशनी कांबळे, ॲड. अमोल वैद्य,
ॲड. प्रतिभा येलेकर यांचा समावेश आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक समितीच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्रक्रिया पार पडली. 
     त्याकरिता चंद्रपूर येथील सर्व सन्माननीय अधिवक्ता, राजुरा येथील सर्व सन्माननीय अधिवक्ता, सोबतच बल्लारपूर, गोंडपीपरी, भद्रावती, वरोरा, कोरपना येथील सर्व सन्माननीय अधिवक्तागण यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले. विजयी कार्यकारिणीने सर्व मतदारांचे आभार मानत बार असोसिएशनच्या विकासासाठी एकजुटीने कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.
नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून वकिलांच्या सोयी-सुविधा, ग्रंथालयाचा विकास, न्यायालयीन कामकाजाशी संबंधित प्रश्न तसेच तरुण वकिलांच्या हितासाठी सकारात्मक निर्णय घेतले जातील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशनच्या प्रगतीसाठी ही कार्यकारिणी महत्त्वपूर्ण ठरेल, असे मत ज्येष्ठ वकिलांनी व्यक्त केले.