Chandrapur News: भक्तिमय वातावरणात नवीन वर्षाचे स्वागत; चंद्रपूरच्या माता महाकाली मंदिरात भाविकांची गर्दी!

Bhairav Diwase
चंद्रपूर:- नवीन वर्षाचे स्वागत प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने केले आहे. कोणी फिरण्यासाठी बाहेर पडले, तर कोणी घरीच सेलिब्रेशन केले. मात्र, चंद्रपूर जिल्ह्याचे आराध्य दैवत असलेल्या माता महाकालीच्या चरणी नतमस्तक होऊन नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी आज भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.


चंद्रपूरच्या ऐतिहासिक महाकाली मंदिरात आज पहाटेपासूनच भक्तीचे वातावरण पाहायला मिळत आहे. वर्षाच्या पहिल्याच दिवशी देवीचे दर्शन घेऊन संपूर्ण वर्ष सुख-समृद्धीचे जावे, या भावनेने हजारो भाविक मंदिरात दाखल झाले आहेत. मंदिराबाहेर भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून प्रशासन आणि मंदिर समितीने दर्शनासाठी चोख व्यवस्था केली आहे.