चंद्रपूर:- चंद्रपूरची शैक्षणिक ओळख असलेल्या 'सर्वोदय शिक्षण मंडळ' द्वारा संचालित 'सरदार पटेल महाविद्यालया'चा सहावा पदवी वितरण आणि गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. शहरातील स्वर्गीय राजेश्वरराव पोटदुखे खुल्या नाट्यगृहात रंगलेल्या या सोहळ्यात पदवीधारकांसह विविध क्षेत्रांत चमकणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
शैक्षणिक, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सरदार पटेल महाविद्यालयाचा सत्र २०२४-२५ चा पदवी वितरण सोहळा एका दिमाखदार वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार सुदर्शन निमकर होते, तर प्रमुख अतिथी म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे उपस्थित होते. मंचावर माझी विद्यार्थी श्याम धोपटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर आणि उपप्राचार्य डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
या सोहळ्यात केवळ पदवीच प्रदान करण्यात आली नाही, तर महाविद्यालयाचे नाव उंचावणाऱ्या गुणवंतांचा विशेष गौरव करण्यात आला. यामध्ये:
आंतरराष्ट्रीय खेळाडू: स्वप्नील जितेंद्र गोंड (उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय खेळाडू)
राष्ट्रीय सेवा योजना: रोशन शंकर चौधरी (उत्कृष्ट स्वयंसेवक) आणि अंकित अशोक लिपटे (उत्कृष्ट स्वयंसेविका)
क्रीडा क्षेत्र: दर्शन ज्ञानेश्वर मेश्राम (उत्कृष्ट पुरुष खेळाडू) आणि स्नेहा बाला गनफाडे (उत्कृष्ट महिला खेळाडू)
विशेष पुरस्कार: भैरव धनराज दिवसे (महाविद्यालय विशेष पुरस्कार)
सांस्कृतिक क्षेत्र: श्रुती उत्तम निकुरे (उत्कृष्ट विद्यार्थी)
शिक्षण क्षेत्र:- दिक्षा विजय गोवर्धन (उत्कृष्ट विद्यार्थी)
मान्यवरांच्या हस्ते गौरव होताच विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी एकच जल्लोष केला. भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी सज्ज होण्याचा संदेश यावेळी पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना दिला.


