Chandrapur News: चंद्रपुरात रमजान ईदचा जल्लोष; ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांनी अदा केली नमाज!

Bhairav Diwase
चंद्रपूर:- चंद्रपूर शहरात आज रमजान ईदचा सण अत्यंत उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला. शहरातील मुख्य केंद्र असलेल्या जनता कॉलेज समोरील ईदगाह मैदानावर आज सकाळपासूनच मुस्लिम बांधवांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.


पवित्र रमजान महिन्याच्या उपवासानंतर आज आनंदाची ईद साजरी होत आहे. यावेळी हजारो हातांनी अल्लाहकडे दुवा मागितली. केवळ मुस्लिम समाजच नाही, तर सर्वधर्मीयांनी एकत्र येत चंद्रपूरच्या या ऐतिहासिक बंधुभावाचे दर्शन घडवले.


या सोहळ्याला राजकीय क्षेत्रातील दिग्गज नेत्यांनीही हजेरी लावली. खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, मनपा स्थायी समिती सभापती मनस्वी गिऱ्हे यांच्यासह शांतता समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकप्रतिनिधींनी मुस्लिम बांधवांची गळाभेट घेत त्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आणि सामाजिक सलोखा जपण्याचे आवाहन केले.