चंद्रपूर:- चंद्रपूर शहरात मार्च एंडिंगच्या पार्श्वभूमीवर महावितरणकडून वीजबिल भरण्यासाठी ग्राहकांवर दबाव आणला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. देयक दिनांकापूर्वीच वीजपुरवठा खंडित केल्याने संतप्त ग्राहक प्रवीण रॉय यांनी कर्मचाऱ्याला जाब विचारत खडेबोल सुनावले.
या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.

