Pombhurna News: चंद्रपूर जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा; पोंभुर्णा परिसरात वादळी पाऊस, पिकांचे नुकसान!

Bhairav Diwase
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा निसर्गाचा कोप पाहायला मिळाला आहे. आज पहाटे ३ वाजताच्या सुमारास ग्रामीण भागाला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. पोंभुर्णा तालुक्यात या पावसाचा जोर सर्वाधिक होता, ज्यामुळे उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

पोंभुर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने मिरची, मका, गहू आणि भाजीपाल्याची लागवड केली होती. अचानक आलेल्या या संकटाने शेतकऱ्यांचे स्वप्न धुळीस मिळवले आहे. सततच्या लहरी हवामानामुळे आणि वारंवार होणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकरी आता पूर्णपणे हवालदिल झाला आहे.