सोमय्या ग्रुपची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद!
चंद्रपूर:- एकीकडे इस्रायल, इराण आणि अमेरिकेतील वाढत्या तणावामुळे जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे असताना, दुसरीकडे महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातून शांततेचा एक बुलंद आवाज घुमला आहे. चंद्रपूरच्या सोमय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशनच्या विद्यार्थ्यांनी आज मानवतेचा आणि शांततेचा संदेश देत थेट 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड'ला गवसणी घातली आहे.
चंद्रपूरच्या वडगाव परिसरातील सोमय्या कॅम्पसमध्ये आज एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार हजारो नागरिक झाले. तब्बल १,३८१ विद्यार्थ्यांनी एकत्र येत जमिनीवर 'मानवी शांतता चिन्ह' (Human Peace Symbol) साकारले. यापूर्वी हा जागतिक विक्रम १,०७० मुलांच्या नावावर होता. मात्र, आज चंद्रपूरच्या लेकरांनी तो रेकॉर्ड मोडीत काढत नवा इतिहास रचला आहे.
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या प्रतिनिधींनी या उपक्रमाचे प्रत्यक्ष निरीक्षण केले आणि विक्रमाची अधिकृत घोषणा केली. सोमय्या ग्रुपचे संचालक पांडुरंग आंबटकर यांना यावेळी जागतिक विक्रमाचे प्रमाणपत्र सुपूर्द करण्यात आले.


Social Plugin