India Win Celebration : भारत टी-20 विश्वविजेता: चंद्रपूरच्या जटपुरा गेटवर विजयाचा जल्लोष!

Bhairav Diwase

चंद्रपूर:- भारतीय क्रिकेट संघाने पुन्हा एकदा जगावर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. २०२६ च्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव करत इतिहास रचला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या या थरारक सामन्यात टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा विश्वविजेतेपदावर आपले नाव कोरले आहे.

या ऐतिहासिक विजयाचे पडसाद देशभरात उमटले. चंद्रपूर जिल्ह्यातही क्रिकेट प्रेमींचा उत्साह शिगेला पोहोचला होता. शहरातील ऐतिहासिक जटपुरा गेट परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी करत जल्लोष साजरा केला. "भारत माता की जय" आणि "वंदे मातरम्" च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.


हातात तिरंगा घेऊन तरुण-तरुणी रस्त्यावर उतरले होते. फटाक्यांची आतिषबाजीत चंद्रपूरकरांनी हा विजय साजरा केला.