Chandrapur News: उन्हाळी जलतरण प्रशिक्षण शिबिराकरिता प्रवेश सुरू

Bhairav Diwase


चंद्रपूर:- जिल्हा क्रीडा संकुल, चंद्रपूर येथील जलतरण तलावाचे विशेष बाब निधी अंतर्गत अद्यावतीकरण करण्यात आले असून राज्य, राष्ट्रीय दर्जाच्या सर्व सोयी सुविधायुक्त जलतरण तलाव तयार करण्यात आला आहे.


लहान मुलांमध्ये जलतरण खेळाची आवड निर्माण व्हावी, त्यांना खेळाचे तंत्रशुध्द प्रशिक्षण मिळावे तसेच शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम व्हावे, याकरिता शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुध्दा लहान व मोठ्या जलतरण तलावामध्ये जलतरण उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन 20 एप्रिल 2026 पासून सुरू झाले आहे.


तसेच 20 एप्रिल पासून प्रवेश देणे आहे. इच्छुकांनी लवकरात लवकर आपले नाव नोंदणी करून आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पूंड यांनी केले आहे. अधिक माहितीकरिता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे संपर्क करावा.