चंद्रपूर:- चिचपल्ली ते मूल या मार्गावर एका वाघाने भररस्त्यात गायीची शिकार केली आहे. रस्ता ओलांडणाऱ्या प्रवाशांनी हा सर्व प्रकार आपल्या कॅमेऱ्यात कैद केला असून, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हे दृश्य आहे चिचपल्ली-मूल मार्गावरील. जंगलाला लागून असलेल्या या रस्त्यावर अचानक एका वाघाने गायीवर झडप घातली. शिकार केल्यानंतर वाघ अत्यंत शांतपणे त्या गायीला आपल्या जबड्यात पकडून रस्ता ओलांडून जंगलाच्या दिशेने निघून गेला. यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहने उभी होती. प्रवाशांच्या डोळ्यांसमोर हा 'लाईव्ह' शिकारीचा थरार घडला. वाघांच्या वाढत्या वावरामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.

Social Plugin