चंद्रपूर:- चंद्रपूरच्या नगिना बाग प्रभागातील महसूल कॉलनी चौकात आज दुपारच्या सुमारास एका दुकानाला भीषण आग लागली. आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केल्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती. परंतु, घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक तथा माजी उपमहापौर राहुल पावडे यांनी अत्यंत तत्परता दाखवली. त्यांनी तातडीने आपल्या कार्यकर्त्यांना घटनास्थळी धाडले आणि अग्निशमन दलाला पाचारण केले.
अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले आहे. सुदैवाने, वेळेत मदत पोहोचल्यामुळे आजूबाजूची दुकाने बचावली असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. प्राथमिक अंदाजानुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे बोलले जात आहे.

