Accident News: विहिरीत पिकअप कोसळून ८ जण ठार; दुर्घटनेत ६ महिन्यांचा चिमुकलाही दगावला

Bhairav Diwase

सोलापूर:- सोलापूरच्या पंढरपुरात विहिरीत पिकअप कोसळल्याची भीषण दुर्घटना घडली. पिकअपमध्ये एकूण १४ जण होते, त्यापैकी ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सहा जणांना वाचवण्यात यश आलं आहे. पंढरपूरच्या तांदूळवाडी गावाजवळ घडलेल्या अपघातातील मृतांच्या नावांची यादी समोर आली आहे. मृतांमध्ये ६ महिन्यांच्या चिमुकल्याचाही समावेश आहे.


सोलापुरातील म्हसवड-पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी गावाजवळ पिकअप गाडी विहिरीत कोसळून भीषण दुर्घटना घडली. या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला. मृत भाविक हे पंढरपूरच्या रांजणी गावचे रहिवासी होते. म्हसवड येथील सिद्धनाथ मंदिराच्या दर्शनासाठी भाविक गेले होते. सिद्धनाथ मंदिराच्या दर्शनानंतर गावी परतत असताना भाविकांच्या पिकअपचा अपघात झाला. अपघातामधील मृतांची नावे समोर आली आहे.

मृतांची नावे

इंदुबाई दशरथ बावचे, महिला , 

पुजा अमोल सातोरे, महिला,

पुजा बालाजी बावचे, महिला ,

अश्विनी संदीप बावचे, महिला ,

अश्विनी संदिप बावचे, महिला ,

संस्कार संदिप बावचे, पुरुष , 

संस्कृती संदिप बावचे, महिला, 

आरव अमोल सातोरे, पुरुष , ८ वर्ष

समर्थ बालाजी बावचे, पुरुष, ६ महिने