4 ग्राहकांसह मालकाविरुद्ध गुन्हा दाखल; 21950 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त
चंद्रपूर:- वरोरा पथकाने शनिवारी ताडोबा रोडवरील कोयना गेटजवळ एका अस्थाई टिनाच्या झोपडीत सुरू असलेल्या बेकायदेशीर मद्यविक्री आणि मद्यपान अड्ड्यावर धाड टाकली. इथे विनापरवाना ग्राहकांना दारू पाजण्याची सोय करून दिली जात होती.
या कारवाई दरम्यान आशिष खोब्रागडे हा मालक आणि मुकेश रामटेके, विकास किरमीरे, राजेश वाघ, अंबादास थेरे हे ४ ग्राहक रंगेहात मद्यपान करताना पकडले गेले. सर्वांची वैद्यकीय तपासणी करून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. या मोहिमेत देशी दारूच्या २०० सीलबंद बाटल्या, वेगवेगळ्या व्हिस्कीच्या २९ बाटल्या, काउंटरवरील रोख रक्कम आणि इतर साहित्य असा एकूण २१ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

