जगभरातील नेटकरी लॉगिन, फीड रिफ्रेश, मेसेजिंग आणि ॲप वापरण्यासंबंधी समस्या येत असल्याच्या तक्रारी नोंदवल्या आहेत. जगभरातील नेटकऱ्यांसाठी चिंचेची बातमी समोर आली आहे. फेसबुक आणि इन्स्टाग्राम सेवा शुक्रवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास अचानक ठप्प झाले आहे. या लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या सेवेत शुक्रवारी अचानक बिघाड झाल्याने जगभरातील करोडो नेटकरी चिंतेत आले आहेत.
सोशल मीडिया सेवा खंडित झाल्यानंतर नेटकऱ्यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर), रेडिट आणि इतर प्लॅटफॉर्मवर आपल्या समस्या मांडण्यास सुरुवात केली. काही नेटकऱ्यांनी फेसबुक अकाउंटमधून अचानक लॉगआउट करण्यात आल्याचे दिसून आले, तर अनेकांना इन्स्टाग्रामवरील पोस्ट, रील्स आणि मेसेजेस लोड होत नसल्याचा अनुभव आला.
आउटेज ट्रॅकिंग करणाऱ्या विविध संकेतस्थळांवरही तक्रारींचा मोठा भडिमार झाला. अनेक नेटकऱ्यांनी ॲप सुरू न होणे, फीड अपडेट न होणे आणि मेसेंजर सेवा विस्कळीत झाल्याची माहिती दिली. काहींना "Account Unavailable" किंवा एरर येत असल्याच्या तक्रारी दाखल केल्या आहेत. दिसल्याचेही समोर आले आहे.
या तांत्रिक बिघाडामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली. काही नेटकऱ्यांनी हा बिघाड जागतिक स्तरावरील सर्व्हर समस्येमुळे झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला. मात्र, याबाबत मेटाकडून अजून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नव्हते.




