Police Bharti Academy: अकॅडमीत पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थ्याला अमानुष मारहाण

Bhairav Diwase
छत्रपती संभाजीनगर:- पडेगाव येथील ‘भारत करिअर अकॅडमी'' या‎ पोलिस भरती अकॅडमीमध्ये शिकणाऱ्या एका 17 ‎वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्याला मेसमध्ये जास्तीचे ‎जेवण घेतल्याच्या क्षुल्लक कारणावरून रबरी ‎पाइप, बेल्ट व काठीने बेदम मारहाण केल्याची ‎धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ‎एवढेच नव्हे, तर क्रूरतेची सीमा ओलांडत ‎विद्यार्थ्याला भिंतीला पाय लावून उलटे उभे‎ राहण्याची अमानुष शिक्षा देण्यात आली.‎ याप्रकरणी क्लासेसचा व्यवस्थापक तथा पीटी‎शिक्षक विवेक ढाकणे याच्या विरोधात छावणी‎ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला‎ आहे.‎


पीडित मुलगा हा मूळचा बुलढाणा येथील ‎रहिवासी आहे. तो गेल्या वर्षीच्या जून ‎महिन्यापासून पडेगाव येथील भारत करिअर ‎‎अकॅडमीत पोलिस भरतीचे प्रशिक्षण घेत आहे. ‎‎मंगळवारी (9 जून) मेसमध्ये जास्तीचे जेवण ‎‎घेतल्याने शिक्षक विवेक ढाकणे याने त्याला ‎‎अमानुषपणे मारहाण केली. घाबरलेल्या मुलाने 9 ‎जून रोजीच आपल्या आईला फोन करून या‎ छळाची माहिती दिली. फिर्यादी आईने तातडीने ‎छत्रपती संभाजीनगर गाठून अकॅडमीचे संचालक ‎घुगे यांची भेट घेत जाब विचारला. तेव्हा मुलाने ‎‎आणखी एक धक्कादायक खुलासा केला. 7 जून ‎‎रोजी ‘टेरेसवर सिगारेट का पितो?’ असा संशय ‎घेऊन ढाकणे याने त्याला टेरेसवर नेऊन बेदम ‎मारले होते, तसेच त्याचे पाय भिंतीला लावून‎ डोक्यावर उलटे उभे केले होते. आईने‎ अकॅडमीतील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची ‎मागणी केली असता, हा सर्व छळ कॅमेऱ्यात कैद‎ झाल्याचे समोर आले. यानंतर छावणी पोलिस‎ ठाण्यात तक्रार देण्यात आली. सहायक पोलिस ‎निरीक्षक यांच्या मार्गदर्शना खाली हवालदार रवींद्र‎ देशमुख या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.‎