Ironing Safety Tips : ऐकून हैराण व्हाल, पण कपडे इस्त्री करताना होऊ शकतो ब्लास्ट; त्यामुळं अजिबात करू नका 'या' 4 चुका

Bhairav Diwase
कपडे छान इस्त्री केलेले असावेत असं प्रत्येकालाच वाटतं, पण हीच रोजची साधी वाटणारी गोष्ट कधीकधी मोठ्या अपघाताला कारणीभूत ठरू शकते. चला तर मग जाणून घेऊयात इस्त्री करताना कोणत्या ४ चुका टाळल्या पाहिजेत. १. शॉर्ट सर्किटचा मोठा धोका

अनेकदा आपण कपडे प्रेस करताना वायरच्या स्थितीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. जर इस्त्रीची वायर कुठेतरी कापलेली असेल किंवा तिचे कोटिंग निघाले असेल, तर तिथे अचानक शॉर्ट सर्किट होऊ शकते.

हे शॉर्ट सर्किट इतके भयंकर असू शकते की यामुळे थेट इस्त्रीचा ब्लास्ट म्हणजेच मोठा स्फोट होऊ शकतो. त्यामुळे वायर जराही खराब दिसल्यास ती त्वरित बदला.

२. पाणी आणि विज

आजकाल बाजारात स्टीम आयरन म्हणजेच पाण्याने चालणाऱ्या इस्त्रीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र, या प्रकारच्या इस्त्रीमध्ये पाणी भरताना किंवा वापरताना अतीव काळजी घेणे गरजेचे आहे.

जर इस्त्रीच्या आतल्या भागात पाणी लीक झाले किंवा वायरवर पाणी पडले, तर मोठा स्फोट होऊन जोरात इलेक्ट्रिक शॉक बसू शकतो. पाणी भरताना नेहमी प्लग काढूनच काम करा.

३. क्षमतेपेक्षा जास्त तापमान आणि ओव्हरहीटिंग

प्रत्येक कपड्याच्या फॅब्रिकनुसार इस्त्रीचे तापमान सेट करणे गरजेचे असते. अनेकदा आपण घाईघाईत टेम्परेचर डायरेक्ट high वर ठेवतो.

जास्त वेळ हाय टेंपरेचरवर इस्त्री चालू राहिल्याने ती ओव्हरहीट होते.

थर्मोस्टॅट खराब असल्यास ही उष्णता नियंत्रणाबाहेर जाते, ज्यामुळे अंतर्गत सुटे भाग वितळतात आणि अंतर्गत दबावामुळे इस्त्रीचा ब्लास्ट होऊ शकतो.

४. सतत चालू ठेवण्याचा निष्काळजीपणा

अनेक घरांमध्ये इस्त्री चालू ठेवून इतर कामे करण्याची किंवा फोनवर बोलण्याची सवय असते. कपड्यांवर जास्त वेळ गरम इस्त्री राहिल्याने केवळ कपडाच जळत नाही, तर इस्त्रीच्या कॉइलवर प्रचंड ताण पडतो.

सतत चालू राहिलेल्या या उष्णतेमुळे अंतर्गत वायरिंग पेट घेऊ शकते आणि पाहता पाहता डोळ्यांसमोर मोठा अपघात घडू शकतो. काम संपताच बटन बंद करणे हाच यावर उत्तम उपाय आहे.