भद्रावती:- डोलारा तलाव पंचशील नगर परिसर येथे पत्त्यांवर पैशांची बाजी लावून जुगार खेळणाऱ्या अड्ड्यावर भद्रावती पोलिसांनी गुन्हे शोध पथकासह धडक कारवाई केली. या धाडीत 9 आरोपींना रंगेहात पकडण्यात आले असून, त्यांच्याकडून वाहने आणि मोबाईलसह तब्बल 5,98,530 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुप्त माहितीच्या आधारे धाड
दिनांक 30 जुलैच्या रात्री डोलारा तलावाजवळ काही इसम 52 पत्त्यांवर हार-जीतचा जुगार खेळत असल्याची पक्की माहिती खबऱ्याद्वारे पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे भद्रावती पोलिसांच्या पथकाने लागलीच घटनास्थळी पोहोचून घेराव घालत धाड टाकली.
अटक करण्यात आलेले आरोपी:
१. धीरज शंकर शेट्टी (वय ३२, रा. झिंगूजी वार्ड, भद्रावती)
२. ऋषीकेश भांकर मडावी (वय २५, रा. पंचशील वार्ड, भद्रावती)
३. मुकेश वासुदेव सोना (वय ३५, रा. डोलारा तलाव, भद्रावती)
४. अजित शंकर शेट्टी (वय २८, रा. किल्ला वार्ड, भद्रावती)
५. मन्नू वासुदेव सोना (वय ३८, रा. डोलारा तलाव, भद्रावती)
६. अमित ओमप्रकाश टेंभुर्णे (वय २६, रा. पंचशील नगर, भद्रावती)
७. उमेश रणदिवे (वय ३५, रा. डोलारा तलाव, भद्रावती)
८. राकेश नामदेव कुळमेथे (वय ३५, रा. पंचशील नगर, भद्रावती)
९. सोनू ज्ञानेश्वर ढेंगळे (वय ३६, रा. किल्ला वार्ड, भद्रावती)
मुद्देमाल जप्त व गुन्हा दाखल
पोलीस धाडीदरम्यान घटनास्थळावरून आणि आरोपींच्या अंगझडतीत 07 मोटारसायकल आणि 06 मोबाईल असा एकूण 5,98,530 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सर्व कायदेशीर पंचनामा पूर्ण करून आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन भद्रावती येथे कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ही यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी, पोउपनि गजानन तुपकर, संतोष केदार, सफौ. महेंद्र बेसरकर, पो.हवा. अनुप आस्टूनकर, देवानंद डुकरे, गोपाळ आतकुलवार, पो.अं. खुशाल कावळे, योगेश घाटोळे, संतोष राठोड आणि भद्रावती पोलीस ठाण्याच्या पथकाने केली.

