आज सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर!
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून पावसाचा वाढता जोर लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आज, ३० जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. हवामान विभागाने वर्तवलेला पावसाचा अंदाज आणि सखल भागात साचणारे पाणी पाहता पालकांनी आपल्या पाल्यांना घराबाहेर पडू देऊ नये, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

