राजकारणात अभ्यासू वृत्ती, दूरदृष्टी आणि विकासाची तळमळ असणारे मोजकेच नेते असतात. त्यात अग्रक्रमाने नाव घेतले जाते ते राज्याचे माजी अर्थ, वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री, बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे खंबीर नेतृत्व आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे!
राजकीय डावपेचांत अत्यंत मुत्सद्दी आणि धुरंधर असणारे हे व्यक्तिमत्त्व सामान्य जनतेच्या मनात मात्र अत्यंत आपुलकीचे स्थान बाळगून आहे. म्हणूनच चंद्रपूर-बल्लारपूरच्या गल्लीबोळापासून ते मंत्रालयाच्या वरिष्ठ गोटात त्यांना सर्वांचे लाडके "भाऊ" म्हणून ओळखले जाते.
मुत्सद्दी राजकारण आणि प्रभावी विधिमंडळ कार्य
सुधीरभाऊ मुनगंटीवार म्हणजे अभ्यासू वक्तृत्व आणि अचूक राजकीय डावपेचांचे उत्तम रसायन. सन १९९५ मध्ये वयाच्या अवघ्या ३३ व्या वर्षी विधानसभेत ५५ हजारांच्या विक्रमी मताधिक्याने प्रवेश करणाऱ्या या नेत्याने नंतर मागे वळून पाहिले नाही.
अर्थमंत्री म्हणून राज्याचा गाढा हाकताना त्यांनी राजकोषीय शिस्त पाळत अनेक महत्त्वपूर्ण योजना मार्गी लावल्या. सांस्कृतिक कार्यमंत्री असताना छत्रपती शिवाजी महाराजांची 'वाघनखे' भारतात परत आणणे ही त्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर वाखाणली गेलेली कामगिरी ठरली. वनमंत्री म्हणून ३३ कोटी वृक्षारोपणाची ऐतिहासिक मोहीम असो किंवा मत्स्यव्यवसाय विभागाचा कायापालट असो — सुधीरभाऊंनी ज्या ज्या मंत्रालयाचा कारभार सांभाळला, तिथे विकासाचा एक नवा ठसा उमटवला.
चंद्रपूर जिल्ह्याचा कायापालट आणि सेवा-सुविधांचे जाळे:
चंद्रपूर जिल्ह्याला विकासाच्या नकाशावर आघाडीवर आणण्याचे श्रेय निश्चितच सुधीरभाऊंना जाते.
गोंडवाना विद्यापीठाची स्थापना: चंद्रपूर आणि गडचिरोलीसारख्या आदिवासी बहुल भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची गंगा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी गोंडवाना विद्यापीठाच्या निर्मितीत मुख्य भूमिका बजावली.
अद्ययावत आरोग्य व क्रीडा सुविधा: चंद्रपुरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMC), कॅन्सर हॉस्पिटल, अत्याधुनिक क्रीडा संकुल आणि रस्ते विकासामुळे जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलला.
सैनिक शाळा व शासकीय अभ्यासाचे केंद्र: जिल्हयातील युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी सैनिकी शाळा आणि अत्याधुनिक ग्रंथालयांचे जाळे विणले.
विकासपुरुष, लोकनेते आणि सर्वांचे लाडके "भाऊ"
राजकारणातील अनेक संकटे आणि संघर्षांना पुरून उरणारे सुधीर मुनगंटीवार जितके आक्रमक लोकप्रतिनिधी आहेत, तितकेच ते तळागाळातील कार्यकर्त्यांशी आणि सामान्य जनतेशी बांधलेले हळवे मनाचे कार्यकर्ते आहेत. "बोले तैसा चाले" या उक्तीप्रमाणे दिलेला शब्द पाळणे आणि चंद्रपूरच्या प्रत्येक नागरिकाच्या सुखा-दुःखात खंबीरपणे पाठीशी उभे राहणे, हीच त्यांची खरी ताकद आहे.
बल्लारपूरच्या विधानसभेचे नेतृत्व करताना त्यांनी प्रत्येक गावाला, प्रत्येक प्रभागाला निधी देऊन 'विकासाची गंगा' घराघरापर्यंत पोहोचवली.
"राजकारणातून समाजकारण आणि समाजकारणातून राष्ट्रनिर्माण... या ध्येयाने अविरतपणे कार्यरत असणारे, विदर्भाचे खंबीर नेतृत्व आणि चंद्रपूर जिल्ह्याचे भाग्यविधाते सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना वाढदिवसाच्या आणि भावी वाटचालीस मनःपूर्वक उदंड शुभेच्छा! 💐✨
शुभेच्छुक:-
भैरव धनराज दिवसे
पत्रकार आणि मुख्य संपादक
आधार न्युज नेटवर्क

