नवी दिल्ली:- NEET परीक्षा आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावरून देशभरात पेटलेल्या आंदोलनानंतर अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे!
गेल्या महिन्याभरापासून दिल्लीच्या जंतर-मंतरवर कॉक्रोच जनता पार्टी (CJP) आणि हजारो विद्यार्थ्यांनी सुरू ठेवलेल्या आंदोलनाला हे सर्वात मोठे यश मिळाले आहे.
धर्मेंद्र प्रधान यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. सोशल मीडियावर राजीनाम्याचे पत्र शेअर करत त्यांनी म्हंटलं आहे की — 'विद्यार्थ्यांचे भविष्य आणि परीक्षा पद्धतीतील पारदर्शकता ही कोणत्याही राजकीय वादापेक्षा किंवा व्यक्तीपेक्षा मोठी आहे.
सीजेपी (CJP) ने केंद्र सरकारला दिलेल्या २४ तासांच्या अल्टीमेटमनंतर आणि सलग ३ फेऱ्यांच्या बैठकांनंतर हा ऐतिहासिक निर्णय समोर आला आहे. चला तर मग, थेट जाऊयात दिल्लीतील जंतर-मंतरवर, जिथे विद्यार्थी या विजयाचा जल्लोष करत आहेत.

