चंद्रपूर:- हा राजीनामा म्हणजे केवळ एक प्रशासकीय कारवाई नसून, देशातील तमाम युवकांनी आपल्या हक्कासाठी आणि न्यायासाठी केलेल्या तीव्र संघर्षाचा हा मोठा विजय आहे. पेपर लीक, भरतीतील घोटाळे आणि शैक्षणिक अन्यायामुळे ज्या निष्पाप विद्यार्थ्यांनी उद्विग्न होऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला, ज्यांनी आत्महत्या केल्या, त्या सर्व विद्यार्थ्यांना ही खरी श्रद्धांजली आहे.
विद्यार्थ्यांचे भविष्य आणि त्यांचे आयुष्य ही खेळाची गोष्ट नाही. प्रशासकीय निष्काळजीपणा आणि भ्रष्ट व्यवस्थेमुळे या देशातील तरुण पिढीने खूप सोसले आहे. भविष्यात कोणत्याही परीक्षेबाबत असा प्रकार घडता कामा नये आणि एकाही विद्यार्थ्याला अन्यायापोटी आपले आयुष्य संपवावे लागू नये, यासाठी संपूर्ण यंत्रणेत पारदर्शकता आणि कठोर उत्तरदायित्व निर्माण झालेच पाहिजे. देश घडवणाऱ्या आपल्या युवा शक्तीच्या पाठीशी आम्ही सदैव खंबीरपणे उभे आहोत.

