बल्लारपूरात हत्या...... #murder #Ballarpur

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
बल्लारपूर:- बल्लारपुर शहरातील हत्यासत्र अजुनही थांबत नसून दि. २९ जुलै ला रात्री 7 वाजताच्या सुमारास बल्लारपुर शहर पुन्हा हत्येच्या घटनेने हादरून गेला आहे. #murder #Ballarpur
प्राप्त माहितीनुसार दि. २९ जुलै ला रात्री 7 वाजताच्या सुमारास बल्लारपुर सास्ती मार्गावर अंधाराचा फायदा घेत गुन्हेगारांनी एका युवकाचा धारदार शस्त्राने गळा कापुन हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. सदर युवक वेकोलि कर्मचारी असल्याची चर्चा आहे. आज पुन्हा एकदा शहरात रक्ताचे पाट वाहिले असुन मागील काही काळातील गुन्हेगारी वाढल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.