चंद्रपूर जिल्हयात अद्याप एकही कोरोना पॉझीटीव्ह रूग्ण आढळलेला नाही.
Bhairav Diwase. April 16, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी)वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर: माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाला 250 पीपीई किट उपलब्ध करून दिले असून या माध्यमातुन कोरोनाच्या विरोधात लढा लढताना सुरू असलेल्या सेवाकार्यात भर घातली आहे.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता चंद्रपूर जिल्हा प्रशासन व आरोग्य विभाग प्रयत्नांची शर्थ करीत आहे. त्यांच्या प्रयत्नांचया फलस्वरूप चंद्रपूर जिल्हयात अद्याप एकही कोरोना पॉझीटीव्ह रूग्ण आढळलेला नाही. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हयातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना सॅनिटायझर वितरीत केले असून त्यांच्या माध्यमातुन मास्क व डेटॉल साबणचे वितरण नागरिकांमध्ये केले जात आहे. श्रीराम धान्य प्रसाद अर्थात जीवनावश्यक वस्तुंच्या किटस वितरण व गरीब, गरजूंसाठी भोजनाची व्यवस्था केली जात आहे. रूग्णांना त्यांच्या घरी सुखरूप पोहचविण्यासाठी वाहन व्यवस्था सुध्दा रूग्णालयांमध्ये त्यांनी उपलब्ध केली आहे. अशा पध्दतीने सुरू असलेल्या सेवाकार्यात जिल्हा प्रशासनाला 250 पीपीई किट पुरवून त्यांनी भर घातली आहे.