सावली तालुक्यातील पारडी येथील सौ.आशाताई व जयदेव दास यांच्या वैष्णवी ब्युटी पार्लर, दास टेलर्स अँड जनरल स्टोअर च्या वतीने स्वतः मशीन वर मास्क बनवून स्वखर्चातून लहान बालकांना मोफत वाटप.

Bhairav Diwase
मास्क तयार करून बालकांना वाटप, दास परिवाराचा स्तुत्य उपक्रम.
Bhairav Diwase.   April 17, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली: सावली तालुक्यातील पारडी येथील सौ.आशाताई व जयदेव दास यांच्या वैष्णवी ब्युटी पार्लर,दास टेलर्स अँड जनरल स्टोअर च्या वतीने स्वतः मशीन वर मास्क बनवून स्वखर्चातून लहान बालकांना मोफत वाटप करण्यात आले.सध्या जगभरात कोरोना विषाणूजन्य संसर्ग रोगाने थैमान घातले आहे.या कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून,युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.ग्रामीण भागात कोरोना विषाणू या संसर्गापासून बचाव करण्यासाठी तसे साधने उपलब्ध नाही.मास्क मेडिकलवाले जास्त दराने विकत असल्याने गरीब लोकांना विकत घेण्यासाठी परवडत नाही म्हणून दास कुटुंबीयांनी आपल्या स्वतःच्या खर्चातुन स्वतःच्या मशीनवर मास्क शिवून लहान बालकांना मोफत वाटप करण्यात आले, जेणेकरुन हे मास्क जास्त दिवस टिकेल आणि याला स्वच्छ धुवून वापरता येईल, या उपक्रमामुळे सर्वत्र दास कुटुंबियांचे कौतुक होत आहे.