दहा वर्षांचा मुलगा पडला एकाकी, मामाकडे आजीसोबत वास्तव्याला.
Bhairav Diwase. April 17, 2020
(मुलाचे वडिल रुपेश रामटेके मुत्युु)
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली: संपूर्ण जग कोरोनाच्या धास्तीने आपापल्या घरी आहे.अशात एक चिमुकल्याच्या वाट्याला आलेल्या वेदना समाजमनालाही अस्वस्थ करीत आहेत.त्याचे नाव संकेत रूपेश रामटेके.तो चौथीत शिकतो.दहा अकरा वर्षांचा असेल.मौजमस्ती करायची अन् आपल्याच विश्वात मनसोक्त रमायचे.पण हल्ली तो खूपच रडतो.पंधरा दिवसांपूर्वीत्याचे बाबा कायमसाठी गेले.अन् आई दूर परप्रांतात महिनाभरापासून अडकली आहे.तीही प्रचंड अस्वस्थ आहे.मायलेकांची ही अगतिकता व्याकूळ करणारी आहे.मला माझ्या मुलाकडे घेऊन चल्ला हो,तो सारखा रडतो असा आर्त टाहो तिने फोडला,बिमार पती व मुलाच्या पालनपोषणासाठी मूल तालुक्यातील बोरचांदली येथील कविता रामटेके तेलंगणातील खम्मम जिल्ह्यातील भजातांडा येथे मिरची तोडणीच्या कामाला गेली.अशात कोरोनाच सावट आले.लॉकडाउनमुळे हजारो मजुरांप्रमाणे तीही अडकली.
लॉकडाउनच्या काळात १ एप्रिल रोजी पतीच्या निधनाची धक्कादायक बातमीने ती थक्कच राहिली. लोकाउनमुळे पतीच्या अंत्यसंस्काराला उपस्थित न राहण्याची दुर्दैवी वेळ कवितावर आली.कविता यांना संकेत नावाच एकुलता एक मुलगा आहे.तो चौथ्या वर्गात शिकतो.हसून खेळण्याचे त्याचे वय.पण या कोवळ्या वयात त्यांच्यावर आलेले संकट न बधविणारे आहे. पंधरादिवसांपूर्वी वडील रूपेश कायमसाठी गेले. मिरची तोडणीसाठी तेलंगणात गेलेली आई लॉकडाउनमुळे अडकली. अशावेळी तो प्रचंड हतबल झाला आहे. सध्या तो आपल्या मामाकडेआजीसह राहतो.
पण आईवडिलांच्या आठवणीने तो दिवसरात्र रडत असतो. जशी संकेतची अवस्था तशीच त्याच्या आईचीही. दोन्ही मायलेक एकमेकांना बघण्यासाठी आतुर आहेत. पण लॉकडाउनने सारेच पर्याय हटले. संकेत व कविता या मायलेकांच्या करून कहाणीने समाजमन अस्वस्थ आहे . सकाळी उठल्यापासून तो आपल्या आजी व मामाला आपली आई कधी येणार,हेच वारंवार विचारतो.अन मग रडायला लागतो.त्याचा हा प्रश्न त्यांनाही डोळ्यात पाणी आणणारा ठरू लागला.आज चंद्रपुरातील काही कार्यकत्यांनी कवितासोबत संवाद साधला. यावेळी तिने आपल्या व्यथा मांडल्या.मला माझ्या मुलाकडे नेऊन दया हो,असा आर्त टाहो कविताने फोडला.