Top News

जिल्हा परिषद चंद्रपूर कडून प्राप्त झालेल्या मेगाफोनचे वितरण.

ग्रामपंचायत उमरी पोतदार, घनोटी, बोर्डा बोरकर, देवाडा खुर्द, जाम खुर्द, केमारा, चिंतलधाबा, चेक बल्लारपुर, येथे मेगाफोनचे वितरण.
     Bhairav Diwase.   April 17, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा: देश सध्या कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सार्वत्रिक स्तरावर सर्वांच्या सहकार्याने एक विश्वयुद्धा प्रमाणे लढा देत आहे. देशातील प्रत्येक सामाजीक, आर्थीक, राजकीय, स्तरावरुन मदतीचा ओघ सुरु झाला. प्रत्येक संघठना, संस्था, व्यक्ती या लढाईत आप-आपला योगदान  देत आहे. काेराेना विषाणू ने जगाला हादरवून साेडलेला आहे. भारतातही काेराेना ग्रस्तांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. राज्यातही कोरोना विषाणू ने कहर घातलेला आहे.चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा जरी एक ही रुग्ण आढळून आलेला नसला, तरी प्रशासना कडून याेग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. आज पंचायत समितीच्या वतीने ग्रामपंचायतीना कोरोणा विषाणू बाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हा परिषद चंद्रपूर कडून प्राप्त झालेल्या मेगाफोनचे वितरण आज ग्रामपंचायत उमरी पोतदार, घनोटी, बोर्डा बोरकर, देवाडा खुर्द, जाम खुर्द, केमारा, चिंतलधाबा, चेक बल्लारपुर, येथे करण्यात आले. तालुक्यातील ग्रामपंचायत वितरण करण्यात आले यावेळी अल्काताई आञाम सभापती पंचायत समिती पोभुर्णा,  ज्योती बुरांडे उपसभापती पंचायत समिती, विनोद देशमुख पंचायत समिती सदस्य, आणि गावातील ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सचिव उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने