Top News

पतीच्या अंत्यसंस्कारापासून जीवनसाथी राहिली कोसो दूर, तेलंगाना येथे पत्नी व बाप अडकलेले.

सावली तालुक्यातील उपरी येथिल दुसरी घटना लॉकडाऊनचा दुर्दैवी परिणाम

      Bhairav Diwase.   April 18, 2020
        (मयताचे नावे नरेंद्र पत्रुजी पेंडलवार)
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली: जग भरात चालु असलेल्या कोरोना विषाणू च्या महामारी ने सध्या लॉकडाऊन सुरू आहे त्या  मुळे पतीचे अंत्यसंस्कारासाठी जीवनसाथी अर्धांगिनी पोहचू न शकल्याची दुखद घटना सावली तालुक्यातील उपरी  येथे नुकतीच घडली. 
    पती पत्नीचे नाते हे जन्मोजन्माचे समजले जाते. पती असो की पत्नी कितीही दूर असले तरी शेवटच्या क्षणी मात्र वाट पाहिल्याशिवाय अंत्यसंस्कार होत नाही. मात्र सद्या भारत देशात  कोरोनाच्या प्रभावामुळे संचार बंदी व लॉकडाऊन चा फटका अनेकाना बसत आहे. त्यामुळे  मजूर असलेली पत्नी पतीच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकली नाही. 
        मूळचे सावली तालुक्यातील उपरी  येथील मयताचे नावे नरेंद्र पत्रुजी पेंडलवार  वय 35/ .मयत नरेंद्र   पेंडलवार यांचा विवाह 13 वर्षांपूर्वी मु. सालेकसा जि .गडचिरोली  येथील अश्विनी हिचेशी प्रेम प्रकरणातून अंतर जातीय विवाह  झाला. परंतु पती ला छोटा सा दुकान होते परिवाराचे उदर निर्वाह होत नसल्या, पत्नी सतत रोजी रोटी करायची. त्यामुळे संसाराचा गाडा चालविण्याचा भार अश्विनी  हिच्यावर होता. मोल मजुरी करून आपल्या 13-10 वर्षाच्या मुलासह पती, सासरा, सासू उपरी ला राहायचे मजुरी करून कुटुंबाचे उदरनिर्वाह करीत होती. मिरची तोडण्याचे कामाकरिता तेलंगणा राज्यात आपल्या पतीला, सासू व मुलाला घरी येथे ठेऊन ही माऊली आपल्या सासरे सोबत मिरचीला गेली.
 
    जगात कोरोनाचे संकट आले. देशात, राज्यात संचारबंदी लागू झाली. त्यामुळे या कुटुंबालाही फटका बसला त्यातच पती नरेंद पत्रुजी पेंडलवार  याची तब्येत पत्नीच्या अनुपस्थित अचानकपणे बिघडली व त्याला गडचिरोली येथील सरकारी सामन्य रुग्णालयात भर्ती करण्यात आले तो आठ दिवस गडचिरोली ला भर्ती होता त्याला गडचिरोली येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी डिस्चार्ज दिल व तो उपरी ला आपल्या घरी होता. मात्र प्रकृती अधिकच खालावली. त्यामुळे पत्नी नसताना नातेवाईकांनी दि 17/ला रात्रौ 10वा  शासकीय रुग्णालयात चंद्रपूर ला नेऊन भरती केले. मात्र तब्येत खालावत असल्याने जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी शरीर सहकार्य करत नव्हत. आणि मात्र उपचारादरम्यान त्याचा सकाळी 4;30 च्या दरम्यान मृत्यु झाला.
             (मयत व्यक्तीची आई, २ मुुल)
     तिकडे पत्नीला व वडिलांना कळवले मात्र लॉकडाऊनमुळे येणे शक्य नव्हते. अश्रूशिवाय काहीच तिच्याकडे पर्याय नव्हता. नातेवाईकांना जीवनसाथी अर्धांगिनी व स्वताच्या वडील शिवाय लहान बालकांना आपल्या आई व आजोबा विना अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ आली. हि सावली तालुक्यातील दुसरी घटना असून कोरोना च्या लाॅकडाऊन मूळे अनेकांच्या नातेवाहीकाणा तेलंगाना राज्यात कामाला . जाणे हे दुर्दैव ठरले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने