एक हात मदतीचा उपक्रमा मार्फत चेक बल्लारपूर येथे गरजू व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंची मदत.

Bhairav Diwase
केमारा-देवाडा जिल्हा परिषद चे लाडके सदस्य श्री. राहुलभाऊ संतोषवार व चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स पोंभूर्णा यांच्या मार्गदर्शनाखाली भैरव दिवसे स्वयंसेवक रा.से.यो, स्वप्नील मंडोगडेे स्वयंसेवक रा.से.यो यांच्या हस्ते चेक बल्लारपूर येथे गरजू व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंची मदत.
Bhairav Diwase.   April 19, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोभुर्णा: महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणू आला आहे. आणि. केंद्रीय सरकार आणि राज्य सरकारच्या आदेशानुसार देश्यातील सर्व राज्य लाॅकडाऊन करण्यात आला आहे. जनतेला घराबाहेर पडु नका. प्रशासनाने केलेल्या सूचनांचे सर्व जनतेने पालन करावे. आणि जनता सुध्दा याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहोत. संपूर्ण देशात कोरोना विषाणू चा संसर्ग वाढत आहे त्यामुळे देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे दैनंदिन मजुरीच्या आधारे कुटुंब जगविणाऱ्या लोकांना जीवन जगतांना खूप अडचणी निर्माण झालेल्या असून, दोन वेळा जेवणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे अशा कुटुंबातील लोकांवर उपासमारीची वेळ येऊ नये. 
    यासाठी जनसामान्य व्यक्तीसाठी कार्य करणारे केमारा-देवाडा जिल्हा परिषद चे लाडके सदस्य श्री. राहुलभाऊ संतोषवार आणि
चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स पोंभूर्णा यांच्या मार्गदर्शनाखाली भैरव दिवसे स्वयंसेवक रा.से.यो, स्वप्नील मंडोगडे स्वयंसेवक रा.से.यो, यांच्या हस्ते चेक बल्लारपूर येथे गरजू व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली. या वेळेस ग्रामपंचायतचे सरपंच दशरथ फरकडे, सिंधु पोगुलवार ग्रामपंचायत शिपाई, राणी कुंचेवार स्वयंसेविक रा.से.यो, पवन फरकडे, शालिक कुळसंगे उपस्थित होते.