पोंभुर्णा तालुक्यातील जामतुकुम येते, आज पासून 3 दिवस सक्त लॉकडाउन.

Bhairav Diwase
गाव लॉकडाउन करण्यासाठी ग्रामपंचायतीने घेतला पुढाकार.
Bhairav Diwase.   April 30, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पाेंभुर्णा : काेराेना विषाणू ने जगाला हादरवून साेडलेला आहे. भारतातही काेराेना ग्रस्तांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. राज्यातही कोरोना विषाणू ने कहर घातलेला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा जरी एक ही रुग्ण आढळून आलेला नसला, तरी प्रशासना कडून याेग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. सध्या जगभरात कोरोना व्हायरस ने थैमान घातले असून, त्याचे पडसाद भारतातही दिसू लागले, महाराष्ट्रात सुद्धा कोरोना चे रुग्ण आढळले, या कोरोना वर मात करण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर करून, शासनस्तरावर अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत, त्याच पार्श्वभूमीवर पोंभुर्णा तालुक्यातील जामतुकुम येते. आज पासून 3 दिवस लॉकडाउन करण्यात आले आहेत. बाहेर गावच्या व्यक्तींना गावात येण्यास सक्त मनाई केली आहे. आणि जर गावात कुणी मास्क न लावता फिरताना आढळल्यास त्याच्या कडून 200 रु दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे. आज सकाळपासून 5 व्यक्ती कडून दंड आकारण्यात आला आहे. या गाव लॉकडाउन करण्यासाठी  ग्रामपंचायतीने पुढाकार घेतलेला आहे. गावातील सरपंच, सचिव, साध्यस, ग्रामस्थांनी व स्वच्छग्रेई मिथीन सिडाम व अभिलाश आकेमवर यांनी ही मोहीम राबवली आहे.