मानवधर्म जोपासत प्रत्येकाला मदतीचा हाथ.
Bhairav Diwase. April 30, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली: सावली तालुक्यात पाथरी येथे विलागिकरण केलेल्या नागरिकांना पद्मशाली फाउंडेशनच्या संचालक रोज त्यांच्या चहा नास्त्याची व्यवस्था करीत आहेत. कोरोनाच्या संकट समयी लॉक डाउन च्या काळात बाहेर जिल्ह्यात अडकलेल्या कामगार वर्गानी लॉक डाउन खुले होणार नाही हे लक्षात येताच आपला पायी मार्ग निवडत कशेबसे आपल्या स्वगावी परतले. परंतु गावात आल्यानंतर बाहेरून आल्यामुळे त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र व स्थानिक ग्रामपंचायत शासन यांच्या मार्फतीने त्यांना जिल्हा परिषद हायस्कुल पाथरी येथे विलगीकरण कशात ठेवण्यात आले. ही बाब पाथरी येथील पद्मशाली फाउंडेशन चे संचालक प्रफुल तुम्मे व राकेश चेन्नूरवार यांच्या लक्षात येताच सुरुवातीच्या पहिल्या दिवसापासूनच सकाळी नाश्ता व दुपारी चहा ची व्यवस्था सातत्याने रोज करीत आहे. कोरोनाच्या या संकटकाळी मानवधर्म जोपासत प्रत्येकाला मदतीचा हाथ पुढे करीत आहे. या कोरोनाच्या संकटकाळी या फाउंडेशन ने सुरुवातीपासूनच कोरोनाशी दोन हात करीत गावामध्ये पत्रके वाटून जनजागृती केली. कपड्याचे मास्क स्वतः शिवून वाटप केले. लोकांना घरीच रहा सुरक्षित रहा अशी जनजागृती केली. गरजूना वेळोवेळी मदत करण्यासाठी सावली तालुक्यातील पाथरी येथील प्रफुल तुम्मे व राकेश चेन्नूरवार सातत्याने प्रयत्न करीत आहे. गाव माझा मी गावाचा ही भावना जोपासत पाथरी येथील पद्मशाली फाउंडेशन संचालक करत असलेल्या कामाची परिसरात चर्चा असून स्तुती केल्या जात आहे.