कोरोनाग्रस्तसाठी सहकारी संस्थेच्या वतीने आर्थिक मदत.
Bhairav Diwase. April 15, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी)मोनिका दि भुरसे साखरी, सावली
सावली: राज्यात कोरोनॉग्रस्त ची संख्या वाढत आहे. त्यामुळे सुविधा निर्माण करण्यासाठी मदत करण्याचा दृष्टिने सावली तालुक्यातील अग्रगण्य म्हणून नावारूपास येत असलेल्या श्री किसान सहकारी तांदूळ गिरणी व्याहाड बुजरुक च्या वतीने, मुख्यमंत्री साह्यता निधि मधे 5,555 रूपयाचा धनादेश संस्थेचे अध्यक्ष सुनील बोमनवार व व्यवस्थापक नितेश भांडेकर यांनी आज सावली तहसीलदार पुष्पलता कुमरे यांचा कडे दिला. तसेच संस्थेच्या वतीने व्याहड़ बुज येथे अनेक गरीब लाभार्थी यांना अनाज चे सुद्धा वाटप करण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष सुनील बोमनवार यांनी सांगितले.