गावातील प्रथम नागरिक तथा महिला काँग्रेसचे तालुका अध्यक्ष उषाताई भोयर यांनी सोशल डिस्टन्स ठेवून साजरी.
Bhairav Diwase. April 15, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी)मोनिका दि भुरसे साखरी, सावली
सावली: तालुक्यातील मेहा बुज येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती गावातील प्रथम नागरिक तथा महिला काँग्रेसचे तालुका अध्यक्ष उषाताई भोयर यांनी सोशल डिस्टन्स ठेवून साजरी केली.कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रतिबंधक उपाय म्हणून ३० एप्रिलपर्यंत लाँकडाउन वाढविण्यात आले आहे. त्यामुळे शासनाच्या अधिसूचनाचा अवलंब करून यावर्षी १४ एप्रिल विश्वरत्न परमपूज्य महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२९ वी जयंती मोठ्या थाटात साजरी करता येणार नसल्याने जनतेच्या सुरक्षिततेचा आणि शासनाच्या सुचना व नियमांचे पालन करत मेहा येथे गावातील काही मुलीला बोलावून त्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग (सुरक्षित अंतर) ठेवत परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आले.