वाहनांचा वापर न करता पायीच जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करावी.
Bhairav Diwase. April 15, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी)वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सध्या एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. मात्र जिल्ह्यामध्ये मोठ्याप्रमाणात तपासणी मोहीम सुरू असून कोणत्याही क्षणी उद्रेक नाकारता येत नाही. त्यामुळे सगळ्यांनी घरीच राहावे, ही प्रशासनाची विनंती असताना विनाकारण फिरणाऱ्या 563 वाहनधारकांची वाहने पोलिसांनी जप्त केली आहे. 126 केसेस करण्यात आल्या असून 37 जणांना अटक करण्यात आली आहे. प्रशासनामार्फत जिल्ह्यातील नागरिकांनी बाहेर पडू नये. तसेच त्यांना जीवनावश्यक वस्तू सुलभतेने मिळाव्यात अशी तारेवरची कसरत सुरू आहे.
यासाठी प्रत्येक घरातील एकाच व्यक्तीने 1 आठवड्यात एकदाच बाहेर निघून जीवनावश्यक वस्तू घरात घेऊन जाव्यात अशी विनंती करण्यात आली आहे.
वाहनांचा वापर न करता पायीच जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करावी असेही स्पष्ट केले आहे. मात्र, तरीही ही अनेक नागरिक निर्देश मोडून घराबाहेर विनाकारण पडत आहे. सध्या जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नसला तरीही खबरदारी म्हणून जिल्ह्यातील प्रत्येक घराची तपासणी सुरू आहे. कोरोना आजाराच्या संक्रमण शक्तीला बघता दुर्लक्ष केल्यानंतर रुग्ण संख्या वाढण्याचे आतापर्यंतचे उदाहरण आहेत. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाने सांगितलेल्या पद्धतीने पुढील 30 एप्रिल पर्यंत घरातच राहणे आवश्यक आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी मोठ्या प्रमाणात नागरिक रस्त्यावर येत असून उद्यापासून आणखी सक्तीने वाहने जप्त करण्याची कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. आतापर्यंत 563 वाहने जप्त करण्यात आली असून सात लाख 94 हजार इतका दंड वसूल करण्यात आला आहे.