बाबासाहेबांच्या अनुयायांनी 'असा' दिला प्रशासनाला मदतीचा हात.

Bhairav Diwase
गोंडपिपरी तालुक्यातील धाबा येथील आंबेडकरी अनुयायांनी आज बाबासाहेबांच्या जयंतीचा कार्यक्रम न घेता लोकवर्गणी केली. व पाच हजार दोनशे रूपये प्रशासनाला सुपुर्द केले. -सिमा गजभीये तहसिलदार,गोंडपिपरी
Bhairav Diwase. April 15, 2020
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य संपादक)भैरव दिवसे, जिल्हा चंद्रपूर
गोंडपिपरी:- बाबासाहेब प्रेम करणा-या कोटयावधी अनुयायांनी घरीच भिमजंयती साजरी केली.पण गोंडपिपरी तालुक्यातील धाबा गावात अतिशय स्तुत्य उपक्रम घेत गावक-यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले. देशात कोरोनाच संकट आहे.अशावेळी शासन प्रशासन जिवाचे रान करित आहे.लाॅकडाउनच्या काळात राज्याला मोठा आर्थीक फटका बसला आहे.अशावेळी धाब्यातील आंबेडकरी अनुयायांनी बाबासाहेेबांची जंयती साजरी न करता लोकवर्गणी केली.पाच हजार दोनशे रूपये जमा करित ते प्रशासनकडे सुपुर्द केले.

कोरानाच्या संकटामुळ आज अख्खा देश थांबला आहे.स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने 3 मे पर्यत लाॅकडाउन वाढविण्याची घोषणा केली.राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण आहेत.अशावेळी प्रशासनाकडून यावर नियंत्रण आणण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत.कोरोनाच्या संकटात आज बाबासाहेबांची जयंती आली.पण अनुयांयानी अतिशय शिस्तबध्दपणे आपआपल्या घरी बाबासाहेबांची जयंती साजरी केली.गोंडपिपरी तालुक्यातील धाबा या गावात आज केवळ दोन लोकांनी बाबासाहेबाच्या पुतळयाला मार्लापण करीत भिमजंयती साजरी केली.यांनतर गावातील आंबेडकरी अनुयायांनी यंदा जाहिर कार्यक्रम न करता संकटकाळात प्रशासनाला मदतीचा कसा हात देता येईल याचे नियोजन केले.अन मग अनुयायांनी प्रत्येकी शंभर रूपयाची लोकवर्गणी गोळा केली.अन बघता बघता पाच हजार दोनशे रूपये जमा झाले.यांनतर गोंडपिपरीच्या तहसिल कार्यालयात तहसिलदार सिमा गजभीये,पुरवठा अधिकारी संघपाल यांच्या उपस्थितीत हि रक्कम प्रशासनाला सुपुर्द करण्यात आली.हि मदत जिल्हाधिकारी चंद्रपूर कोव्हिड 19 या खात्यावर जमा करण्यात येणार आहे.कोरोनाचा सामना करतांना राज्याची आर्थीक स्थिती चांगलीच डबघाईस आली आहे.अशावेळी समाजातील दिलदार लोक प्रशासनाला मदतीचा हात देत आहेत.बाबासाहेबांची सार्वजनिक जयंती साजरी न करता लोकवर्गणी करून धाबा येथील आंबेडकरी अनुयायांनी प्रशासनाला मदतीचा हात देत सामाजीक दायीत्वाचा परिचय दिला.तोडकी का होईना पण मदत करण्याची भावना असेल तर हात समारे येतातच याचा प्रत्यय धाब्यातील अनुयांयांनी दिला.

गोंडपिपरी तालुक्यातील धाबा येथील आंबेडकरी अनुयायांनी आज बाबासाहेबांच्या जयंतीचा कार्यक्रम न घेता लोकवर्गणी केली. व पाच हजार दोनशे रूपये प्रशासनाला सुपुर्द केले.
-सिमा गजभीये तहसिलदार,गोंडपिपरी